पालघरमध्ये सलग सहाव्या दिवशी पाऊस सुरूच, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान
गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी वाढला. त्यामुळे राज्यातील काही भागांसह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत झालं.
गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी वाढला. त्यामुळे राज्यातील काही भागांसह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाने दाणादाण उडवली. वैतरणा आणि पिंजाळ नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पावसामुळे मनोर- वाडा तसंच वाडा- भिवंडी रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पावसामुळे शेतकऱ्यांचंही प्रचंड नुकसान झालं आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
Published on: Jul 14, 2022 01:13 PM
