Sanjay Gaikwad : शस्त्र, अस्त्र, दगड, धोंडे अन्… जलील यांच्यासोबत लढाई होणार, गायकवाडांचा स्टॅम्प पेपरवरील करार नेमका काय?

Sanjay Gaikwad : शस्त्र, अस्त्र, दगड, धोंडे अन्… जलील यांच्यासोबत लढाई होणार, गायकवाडांचा स्टॅम्प पेपरवरील करार नेमका काय?

| Updated on: Jul 23, 2025 | 6:47 PM

आमदार संजय गायकवाड आणि इम्तियाज जलील यांच्यातील वादाला एक अनोखं वळण मिळाले आहे. 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर झालेल्या करारानुसार, दोघांमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत शस्त्रास्त्रांशिवाय लढाई होणार आहे. लढाईची तारीख आणि वेळ जलील यांनी ठरवावी असे गायकवाड यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक करारनामा केला आहे. इम्तियाज जलील आणि माझी लढाई होणार, असं संजय गायकवाड यांनी यामध्ये म्हटलं आहे. लढाईमध्ये शस्त्र, अस्त्र, दगड, धोंडे, इतर शस्त्र आणि साहित्याचा वापर होणार नाही, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे. दोघांच्या लढाईमध्ये तिसरा येणार नाही याची दक्षता पोलीस घेतील तर या लढाईची तारीख आणि वेळ इम्तियाज जलील यांनी ठरवावी, असं आव्हान गायकवाड यांनी दिलं आहे.

लढाईमध्ये दोघांचं बरं वाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांची असेल, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे. यासह या प्रकरणामध्ये दोघेही पक्ष आणि धर्म यामध्ये आणणार नाही. लढाईमध्ये मित्र, नातेवाईक, समर्थक, कार्यकर्ता यांना मध्ये घेणार नाही. दरम्यान, मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमधल्या मारहाणीनंतर इम्तियाज जलील यांनी मला मारणार असल्याचे सांगितलं आहे. बुलढाण्यामधल्या सभेत जलील यांनी मला मारण्याचं आव्हान दिलं. त्या अनुषंगाने हा करारनामा दोघेही करत आहोत, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 23, 2025 03:35 PM