महाराष्ट्रामध्ये कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे, Rajesh Tope यांची माहिती

महाराष्ट्रामध्ये कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे, Rajesh Tope यांची माहिती

| Updated on: May 13, 2021 | 8:16 PM

महाराष्ट्राची परिस्थिती सुधारत आहे, ही चांगली बाब आहे. महाराष्ट्र चाचण्यामंध्ये चांगले काम करत आहे, असे म्हणाले. (Corona's condition is improving in Maharashtra, says Rajesh Tope)

मुंबई : परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. सध्या ग्राफ कमी होत आहे. सध्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण कमी होत आहेत. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात रुग्ण वाढत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा मराठवाड्यातील बीड येथे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला सातत्याने काळजी घ्यावी लागणार आहे. जागरुक राहावे लागणार आहे. चाचण्या कमी होत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, आज झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्राची परिस्थिती सुधारत आहे, ही चांगली बाब आहे. महाराष्ट्र चाचण्यामंध्ये चांगले काम करत आहे, असे म्हणाले आहेत. बारा कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात आतापर्यंत तीन कोटी चाचण्या झाल्या आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.