VIDEO : Neil Somaiya यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

VIDEO : Neil Somaiya यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

| Edited By: | Updated on: Apr 12, 2022 | 3:55 PM

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणात सोमय्या पिता पुत्राच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस आज दुपारी अचानक सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांच्या घरी आले. त्यांनी नील यांच्या घराची बेल वाजवली. पण कोणीही प्रतिसाद दिला नाही.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणात सोमय्या पिता पुत्राच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस आज दुपारी अचानक सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांच्या घरी आले. त्यांनी नील यांच्या घराची बेल वाजवली. पण कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या दारावर नोटीस लावली आहे. सहा ते सात पोलीस नील सोमय्या यांच्या घरी आले होते. काही पोलीस साध्या वेशात होते तर काहींनी वर्दी परिधान केलेली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलुंडच्या निलम नगरमधील सोमय्या यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. तिथेही सोमय्या यांच्या घरातून काहीच प्रतिसाद न आल्याने पोलिसांनी सोमय्या यांच्या घरावर नोटीस लावली.