Pune | पुण्यात आज कोव्हिशिल्ड लस संपल्याने लसीकरण केंद्र बंद

Pune | पुण्यात आज कोव्हिशिल्ड लस संपल्याने लसीकरण केंद्र बंद

| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 10:34 AM

पुणे शहरात आज फक्त सात ठिकाणी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहे. सहा केंद्रांवर प्रत्येकी 1 हजार तर एका केंद्रावर 500 डोस उपलब्ध आहेत. कोव्हिशील्ड लस संपल्याने या लसीचे केंद्र बंद आहेत. तर दुसरीकडे पुणेकरांनी खासगी लसीकरण केंद्रांकडे पाठ फिरवली आहे.

पुणे शहरात आज फक्त सात ठिकाणी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहे. सहा केंद्रांवर प्रत्येकी 1 हजार तर एका केंद्रावर 500 डोस उपलब्ध आहेत. कोव्हिशील्ड लस संपल्याने या लसीचे केंद्र बंद आहेत. तर दुसरीकडे पुणेकरांनी खासगी लसीकरण केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे खासगी लसीकरण केंद्रात चार लाख 61 हजार लसींचा साठा पडून आहे. जिल्ह्यातील खासगी दवाखान्यांकडे उपलब्ध असलेला लसींचा साठा जिल्हा प्रशासन उधारीवर घेणार असल्याची माहिती आहे. या माध्यमातून लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रशासनाचा विचार असून त्या बदल्यात खासगी दवाखान्यांना नव्या लसींचा साठा पुरवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली.