Nanded मधून 5 लाख रुपये घेऊन पळालेल्या अल्पवयीन मुलाला Cyber Police यांना शोधण्यात यश
दोन्ही मुलांचे अपहरण झाले असल्याचे समजून आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेडमध्ये गुन्हा दाखल होता. मुंबई सायबर पोलिसांनी या मुलांचा मालाड परिसरातून शोध घेतला आणि 5 लाखांच्या रकमेसह नांदेड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
नांदेड : नांदेडमधून 5 लाख रुपये घेऊन पळून आलेल्या अल्पवयीन मुलाला शोधण्यात सायबर पोलिसांना यश आले. मुंबई सायबर पोलिसांनी मुलाचा शोध घेतला. अल्पवयीन मुलगा हा 15 वर्षांचा असून घरातून निघताना त्याने 5 लाख सोबत आणले होते. त्याच्यासोबत आशिष कांबळे नावाचा आणखी एक मुलगा मुंबईत आला होता. दोन्ही मुलांचे अपहरण झाले असल्याचे समजून आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेडमध्ये गुन्हा दाखल होता. मुंबई सायबर पोलिसांनी या मुलांचा मालाड परिसरातून शोध घेतला आणि 5 लाखांच्या रकमेसह नांदेड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
