दादर रेल्वे स्थानकाजवळ दोन एक्सप्रेसचा अपघात, नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 15, 2022 | 11:20 PM

मध्य रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार दादर स्टेशनवरुन पॉन्डिचेरी एक्सप्रेस निघाली. तिच्या पाठोपाठ गदग एक्सप्रेसही दादर स्टेशनवरुन निघाली. तेव्हा गदग एक्सप्रेसने पॉन्डिचेरी एक्सप्रेसच्या मागील डब्याला धडक दिली. या अपघातात पॉन्डिचेरी एक्सप्रेसचे तीन डबे रेल्वे रुळावर घसरले.

Follow us on

मुंबईतील दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान दोन रेल्वे एकमेकांवर आदळून मोठा अपघात घडलाय. दोन्ही रेल्वे गाड्या क्रॉसिंगवेळी एकमेकांवर आदळल्या. यावेळी शॉट सर्किटही झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली. पॉन्डिचेरी एक्सप्रेस आणि गदग एक्सप्रेस क्रॉसिंगवर एकमेकांवर आदळल्या. शुक्रवारी रात्री साडे आठ ते नऊच्या सुमारास हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की दोन ते तीन वेळा शॉर्ट सर्किट झालं. तसंच पॉन्डिचेरी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरुन घसरले. तसंच रेल्वेचे डबे मोठ्या प्रमाणात घासले गेल्याचं पाहायला मिळत आहे.