NCP : अजितदादांच्या केबिनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, कोकाटेंसह भुजबळ दाखल, बघा काय घडलं?

NCP : अजितदादांच्या केबिनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, कोकाटेंसह भुजबळ दाखल, बघा काय घडलं?

| Updated on: Jul 29, 2025 | 12:37 PM

आता माझ्या हातात काहीच नाही. किती वेळा तुम्हाला वाचवायचं, किती वेळा माफ करायचं? असा सवाल करत कोकाटे तुमच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचे म्हणत अजित पवारांनी कृषीमंत्र्यांना सुनावल्याचे पाहायला मिळाले.

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्यासाठी विरोधकांकडून मागणी जोर धरत असताना आज राजकीय वर्तुळात मोठी घडामोड पाहायला मिळाली. माणिकराव कोकाटे यांनी आज अजित पवारांची भेट घेतली. मुंबई मंत्रालयातील अजित पवारांच्या अँटी-चेंबरमध्ये माणिकराव कोकाटे भेटीसाठी दाखल झाले होते. माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्या साधारण अर्धातास चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र या बैठकीत अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

अजित पवार म्हणाले, कोकाटे तुमच्या वक्तव्य आणि वर्तवणुकीने सरकारची बदनामी होतेय. बोलताना भान ठेवायला हवं, अशा स्पष्ट शब्दात अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले. इतकंच नाहीतर तुमच्या वक्तव्यामुळे सरकारची खूप प्रतिमा मलिन झाली आहे. आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं आहे. पण हा विषय आता पुढे गेला असून मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात नाराजी व्यक्त केल्याचे अजित पवारांनी म्हटलंय. दरम्यान, या भेटीदरम्यान अजितदादांच्या केबिनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. कोकाटेंसह छगन भुजबळ देखील दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Jul 29, 2025 12:35 PM