Ajit Pawar : अजित पवार यांचे नियोजित कार्यक्रम रद्द, दादा आजारी! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ajit Pawar : अजित पवार यांचे नियोजित कार्यक्रम रद्द, दादा आजारी! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

| Updated on: Sep 10, 2025 | 11:54 AM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहेत. त्यांच्या कार्यालयाकडून आजारी असल्याने हे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, यामागे कुर्डू गावातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणाचा आणि महिला आयपीएस अधिकाऱ्याशी झालेल्या वादाचा हात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे सर्व कार्यक्रम आजारी असल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत. अजित पवार यांच्या पक्षाच्या कार्यालयाने ही माहिती अधिकृतपणे दिली आहे. याआधी, वरळी येथील एका बैठकीला देखील ते अनुपस्थित होते. मात्र या अनुपस्थितीने सध्या चर्चांना उधाण आलंय.  कुर्डू येथील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणातील त्यांच्या सहभागामुळे अजित पवार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.  या प्रकरणात एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी झालेल्या वादाचा उल्लेखही आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी अजित पवारांवर मिडीया ट्रायल केली जात असल्याचा आरोप केला आहे. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी कुर्डू येथील मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले असून, सरपंच, ग्रामसेवक आणि इतर अनेकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Published on: Sep 10, 2025 11:54 AM