Ajit Pawar : मी दिसायला देखणा, चिकना… कुणी माझ्या बायकोलाही सांगा… अजित पवार असं म्हणाले अन्…
अजित पवारांच्या हस्ते धडपड भाग 3 या पुस्तकाचे प्रकाशन पार पडलं. यावेळी अजित पवार यांनी मिश्कील भाष्य केले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते धडपड भाग 3 या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुण्यात या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पजला. या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी उपस्थितांशी मिश्कील संवाद साधला. मी पुस्तकाचे प्रकाशन केलं की पुस्तक जास्त विकलं जाते का? असा सवाल करत मला रॉयलटी पाहिजे… असं विनोदी भाष्य अजित पवारांनी पुण्यात केलं. धडपड भाग 3 या पुस्तकात माझा उल्लेख देखणा, चिकना असा केलाय…असं अजित पवार म्हणाले. तर मला देवेंद्र फडणवीस सांगत होते त्यांनी राजकारणात येण्याआधी मॉडेलिंग केलेय….मी जर एवढा देखणा चिकना आहे तर माझ्या बायकोला पण सांगा की….ती मला कधीच म्हणाली नाही, असं अजित पवार मिश्कीलपणे म्हणाले.
Published on: Jun 09, 2025 07:44 PM
