Ajit Pawar : अजित पवार स्पष्टच म्हणाले, इथं पहिलं मराठी, कारण हा महाराष्ट्र…

Ajit Pawar : अजित पवार स्पष्टच म्हणाले, इथं पहिलं मराठी, कारण हा महाराष्ट्र…

| Updated on: Jul 24, 2025 | 4:27 PM

राज्यात मराठी-हिंदीचा वाद सुरू असताना अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यासोबत परप्रांतीय आणि अमराठी भाषिक व्यक्तींकडून होणारा मराठीचा अपमान आणि त्यांच्या मुजोरीवरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सगळ्यांनी आपापलं भान ठेवून बोललं पाहिजे किंवा वागलं पाहिजे, असं म्हणत अमराठी भाषिक व्यक्तींना, परप्रांतीयांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसावलंय. पुढे अजित पवार असंही म्हणाले, प्रत्येक राज्यातील मातृभाषा ही महत्त्वाची असते. पण त्या-त्या मातृभाषेप्रमाणेच आपला भारत देश आहे. आपल्या भारतात त्या-त्या राज्यांची मातृभाषा सोडल्यानंतर जर दुसरी कुठली भाषा चालत असेल तर ती हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी भाषा चालते. इतकंच नाहीतर तर अजित पवार असंही म्हणाले,  प्रत्येकाला आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम, आदर असला पाहिजे. ती भाषा टिकली पाहिजे. पण आता जे घडतंय की महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी येत नसेल तर त्यांनी सांगावं की आम्ही महाराष्ट्रात राहतो पण चांगली मराठी येत नाही पण मराठीचा आम्ही आदर करतो. आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो, असं बोलाना.. पण काही मुजोरी दाखलतात.. असं चालत नाही.

Published on: Jul 24, 2025 04:27 PM