Ajit Pawar : कोकाटेंचा रमीचा व्हिडीओ खरा असेल तर काय होणार कारवाई? अजितदादांनी सगळंच सांगून टाकलं
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाच्या व्हिडीओसंदर्भात चौकशी सुरू आहे. कदाचित कृषीमंत्र्यांसोबत येत्या सोमवारी माझी भेट होईल. भेट झाल्यानंतर कोकाटेंशी चर्चा करूण निर्णय घेणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
विधानभवनातील सभागृहात कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्या मोबाईलवर रमी खेळत असलाचा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय. गेल्या आठवड्याच रोहित पवारांनी कोकाटेंवर केलेल्या आरोपांनंतर कोकाटेंच्या राजीनामाच्या मागणी जोर धरू लागलीये. दरम्यान, कोकाटेंचा रमी खेळतांचा व्हिडीओ कोणी शूट केला? कोकोटे खरंच रमी खेळत होते की जाहिरात स्किप करत होते? याची सत्यता पडताळण्यासाठी विधिमंडळ सचिवालयाने चौकशी सुरू केली आहे.
अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात सवाल केला. यावर अजित पवारांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली. जर कोकाटेंच्या व्हिडीओमध्ये तथ्यता आढळली तर हा विषय सरकारच्या अखत्यारीतील विषय असेल, मुख्यमंत्री आणि आम्ही एकत्र निर्णय घेऊ, असे अजित पवार म्हणाले. तर महायुती सरकारमध्ये काम करत असताना कोणत्याही व्यक्ती, नेता, मंत्र्यांकडून महायुती सरकारला कमी पणा वाटेल असं वक्तव्य कृत्य होता कामा नये, असं स्पष्टपणे त्यांनी मत व्यक्त केलं.
