Ajit Pawar : ३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
DCM Ajit Pawar On Farmer Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र ३१ तारखेच्या आधी पीक कर्ज भरण्याची सूचना शेतकऱ्यांना केली आहे.
31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे. सगळी सोंगं करता येतात. पण पैशांचं सोंग करता येत नाही असंही अजित पवार यांनी म्हंटलं आहे.
एकीकडे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात सरसकट पिककर्ज माफीची घोषणा केली होती. मात्र सत्ता आल्यापासून अद्यापही यावर कोणता निर्णय झालेला नाही. त्यातच आता 31 तारखेच्या आत सगळ्या शेतकऱ्यांनी पीककर्ज भरण्याच्या सूचना अजित पवार यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना केल्या आहेत. सगळी सोंग करता आली तरी पैशांचं सोंग करता येत नाही, असंही त्यांनी म्हंटलं आहे. यावर पुढे बोलताना अजितदादा म्हणाले की, आम्ही अर्थसंकल्प हा वास्तववादी भूमिका घेऊन सादर केलान् आहे. मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते. पण मी राज्यातल्या जनतेला सांगतो 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितलं होतं, ते प्रत्यक्षात येत नाही. आता तशी परिस्थितीही नाही. भविष्यात परिस्थिती पाहून आम्ही निर्णय घेऊ. या आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी आपली परिस्थिती नाही, असं स्पष्टपणे अजित पवार यांनी यावेळी सांगितलं आहे.
