Video : आता भोंग्याचा विषय चर्चेत आणण्याची आवश्यकता नव्हती- अजित पवार

| Updated on: Apr 28, 2022 | 2:43 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भोंग्यावरून चाललेल्या राजकारणावर आपलं मत व्यक्त केलं. “भोंग्याबाबत आम्ही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. त्यात मनसे सोडले तर सर्व पक्षांनी त्यांची भूमिका मांडली. कारण नसताना वातावरण खराब करू नका. मिळून मिसळून काम करा. उद्या निर्णय घ्यायचं ठरलं, तर ठराविक वर्गासाठी निर्णय घेता येणार नाही. बाकीचे कोर्टात जातील. मागे वेगवेगळे निर्णय […]

Follow us on

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भोंग्यावरून चाललेल्या राजकारणावर आपलं मत व्यक्त केलं. “भोंग्याबाबत आम्ही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. त्यात मनसे सोडले तर सर्व पक्षांनी त्यांची भूमिका मांडली. कारण नसताना वातावरण खराब करू नका. मिळून मिसळून काम करा. उद्या निर्णय घ्यायचं ठरलं, तर ठराविक वर्गासाठी निर्णय घेता येणार नाही. बाकीचे कोर्टात जातील. मागे वेगवेगळे निर्णय सुप्रीम कोर्टाने दिले आहेत”, असं ते म्हणाले. तसंच त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याबाबही भाष्य केलं. युपीमध्ये काय करायचं त्याचा अधिकार तिथल्या मुख्यमंत्र्याना आहे.  पण महाराष्ट्रात आता हा विषय चर्चेत आणण्याची गरज नव्हती. असं अजित पवार म्हणाले आहेत.