Ajit Pawar : तिकडं तडफडू नका अन् ठ्यॅव-ठ्यॅव करू नका, दादांची पदाधिकाऱ्यांना तंबी, बघा नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar : तिकडं तडफडू नका अन् ठ्यॅव-ठ्यॅव करू नका, दादांची पदाधिकाऱ्यांना तंबी, बघा नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Aug 02, 2025 | 5:52 PM

कुठे चौफुलीला जाऊन तडफडू नका किंवा कुठे जाऊन ठ्यॅव-ठ्यॅव करू नका असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे. आमदार शंकर मांडेकर यांच्या समोरच ही तंबी दिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांना एका कार्यक्रमातून सज्जड दम दिला आहे. आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीतच अजित पवार यांनी तंबी दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. दौंड तालुक्यातील केडगाव चौफुलीतील गोळीबार प्रकरणात दादांच्या पक्षाच्या आमदाराच्या भावाचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर या प्रकरणावरून विरोधकांकडून जोरदार टीका सुरू होती. वाखारी गेल्या आठवड्यात गोळीबार झाला होता. भोर भेटला मुळशीचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा त्यात सहभाग असल्याच स्पष्ट झालं होतं. पीडीसीसी बँकेतील एका कार्यक्रमात बोलताना दादांनी आमदार शंकर मांडेकर यांच्या समोरच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे. केडगाव येथील गोळीबार प्रकरण काय आहे? बघा व्हिडीओ

Published on: Aug 02, 2025 05:51 PM