Eknath Shinde : लपून छपून काही नाही तर… दिल्लीत शहांच्या भेटीचं कारण नेमकं काय? शिंदेंनी स्पष्टच सांगितलं…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर असून, गाठीभेटींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदेंनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर ते पंतप्रधान मोदींना देखील भेटणार आहे.
दिल्ली दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या भेटीगाठी घेतल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली यानंतर ते पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, याभेटीपूर्वी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे, मी लपून छपून काही काम करत नाही. मी जे करतो ते सगळ्यांच्या समोर करतो. सर्व खासदारांसोबत मी आज गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. खासदारांचे काही विषय होते, ते या भेटीदरम्याान मांडले, असे शिंदेंनी सांगितले तर मी जाहीरपणे भेटतोय, खासदारांसोबत भेटतोय, केंद्र आणि राज्य सरकार जे काही सकारात्मक प्रकल्प मिळून सुरू आहेत, अशा प्रकल्पांसंदर्भात देखील या भेटीमध्ये चर्चा झाली. पण विरोधकांची चर्चा दुसऱ्याच गोष्टीवर…असंही शिंदे म्हणाले.
