Eknath Shinde : शिवसेनेतून भाजपात धडाधड इनकमिंग… शिंदे म्हणाले, आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय…

Eknath Shinde : शिवसेनेतून भाजपात धडाधड इनकमिंग… शिंदे म्हणाले, आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय…

| Updated on: Nov 19, 2025 | 1:45 PM

महापालिका निवडणुकांची घोषणा अद्याप झालेली नसतानाही, महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील (शिंदे गट) प्रमुख नेत्यांना आणि माजी नगरसेवकांना पक्षात घेतल्याने महायुतीमध्येच संघर्ष निर्माण झाला आहे.

महायुतीच्या एकजुटीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर महायुती मजबूत झाली पाहिजे आणि महायुतीला गालबोट लागू नये, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासह महायुतीमध्ये अंतर्गत प्रवेश नकोत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे नमूद करत, मुख्यमंत्री त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील असेही एकनाथ शिंदे सूचकपणे म्हणाले. शिवसेनेतून भाजपमध्ये झालेल्या इनकमिंगवर प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी महायुतीमध्ये कुठेही मतभेद होऊ नयेत आणि कुठलाही मिठाचा खडा पडू नये यासाठी काळजी घेणार असल्याचे स्पष्ट केले.

Published on: Nov 19, 2025 01:45 PM