Guru Purnima 2025 : गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे ठाण्यातील आनंदाश्रमात, आनंद दिघेंना केलं वंदन अन्..
एकनाथ शिंदे यांनी आज आनंदाश्रमाला दिलेली भेट ही गुरु-शिष्य परंपरेला आदराने जपण्याचा एक भाग म्हणून पाहायला मिळाली. तर शिंदे यांच्या राजकीय प्रवासात आनंद दिघे यांचे महत्त्व अधोरेखित करते.
गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंदाश्रमात उपस्थिती लावली. आनंदाश्रम हे त्यांचे राजकीय गुरू धर्मवीर आनंद दिघे यांचे निवासस्थान असून तेथे आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना अभिवादन करून एकनाथ शिंदेंनी गुरुपौर्णिमा साजरी केली. एकनाथ शिंदे दरवर्षी गुरुपौर्णिमेला आनंद दिघे यांना आदराने वंदन करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिंदे गटातील अनेक नेते, खासदार, आमदार आणि शिवसैनिकही ठाण्यातील आनंदाश्रमात उपस्थित होते. गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर उद्या ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश केला.
गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यातील वंदे मातरम संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष वैभव वाघ यांचा शिवसेनेत प्रवेश पार पडला. पुण्यातील शुक्रवार पेठ सेवा मित्रमंडळ आणि वंदे मातरम संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष वैभव वाघ याचा शिवसेनेत आज पक्ष प्रवेश झाला. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसोबत पक्ष प्रवेश ठाण्यातील टेंभी नाका येथे पार पडला. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश झाला.
