MPSC | MPSCच्या रिक्त जागांबाबतची डेडलाईन संपली

| Updated on: Sep 30, 2021 | 8:28 PM

सरकारमधील रिक्त पदांची माहिती जमा करण्याची डेडलाईन हुकली आहे. MPSC मार्फत भरती करण्यासाठी राज्य सरकारने सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्यास सांगितले होते.

Follow us on

YouTube video player

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जमा करण्यास सांगितली होती. मात्र, काही विभागांनी माहिती एमपीएससीला देण्यास दिरंगाई केल्याचं समोर आलं आहे. सरकारमधील रिक्त पदांची माहिती जमा करण्याची डेडलाईन हुकली आहे. MPSC मार्फत भरती करण्यासाठी राज्य सरकारने सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्यास सांगितले होते. अजित पवार यांनी राज्य सरकारच्या रिक्त पदांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरती करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या 43 विभागांपैकी केवळ 10 विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जमा केल्याचं समोर आलं आहे. 43 पैकी 10 विभागांनी माहिती जमा केल्यानंतर इतर विभागांची माहिती जमा करण्यासाठी धावपळ सुरु असल्याचं दिसून आलं आहे.