Breaking | देबाशिष चक्रवर्ती राज्याच्या मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला

| Updated on: Nov 30, 2021 | 7:26 PM

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ आज संपला आहे. कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवला होता. मात्र, केंद्रानं हा प्रस्ताव स्वीकारला नाही. त्यामुळे कुंटे राज्याच्या मुख्य सचिव पदावरुन आज निवृत्त झाले. कुंटे यांच्या जागी आता नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला आहे.

Follow us on

सीताराम कुंटे यांना तीन महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे सादर केला होता. मात्र, केंद्राकडून राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. संध्याकाळपर्यंत राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर करण्यात न आल्यानं अखेर कुंटे यांना निवृत्त व्हावं लागलं आहे. त्यामुळे राज्य सरकारला नव्या मुख्य सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सीताराम कुंटे हे 1985 च्या महाराष्ट्र बॅचचे अधिकारी आहेत. कुंटे हे मार्च 2021 पासून राज्याच्या मुख्य सचिवपदी होते. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात त्यांनी चांगलं काम केलं. तसंच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अधिकारी मानले जात होते. तसंच कुंटे यांची काम करण्याची पद्धत आणि सरकारमधील मंत्र्यांसोबतचे चांगले संबंध त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही.