निवडणूक बिनविरोध करण्याचा शरद पवार यांनी पायंडा पाडावा; दीपक केसरकर यांचं आवाहन

| Updated on: Feb 05, 2023 | 12:06 PM

कसबा पेठ, चिंचवड या जागांकरता बिनविरोध निवडणूक करण्यासाठी शरद पवार नक्की पुढाकार घेतील, दीपक केसरकरांचा विश्वास

Follow us on

मुंबई : निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मधल्या काळात ही परंपरा खंडित झाली होती. तेव्हा शरद पवार यांनी पुढाकार घेऊन ती परंपरा पुन्हा सुरू केली आहे. शरद पवार सर्वांचेच नेते आहेत. त्यामुळे पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागांसाठी बिनविरोध निवडणूक करण्यासाठी शरद पवार नक्की पुढाकार घेतील, असे म्हणत मंत्री दीपक केसरकरांनी विश्वास व्यक्त केला आहे. विधानपरिषदेच्या निकालावर कोणीही हरळून जाण्याची गरज नाही, याचं विश्लेषण मी शिक्षणमंत्री म्हणून केले असून जो प्रश्न जुन्या पेन्शनचा आहे, तो२००५ मध्ये जे शिक्षक आणि सेवक होते त्यांच्या संदर्भातील आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे वचन दिले असल्याचेही केसरकर यांनी म्हटले आहे.