Udhav Thackeray LIVE : काही वर्षांनी बालभारती गायब होईल; पत्रकार परिषदेत दीपक पवार यांनी व्यक्त केली भीती
Udhav Thackeray LIVE Press Conference : उद्धव ठाकरेंकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दीपक पवार यांनी हिंदी सक्तीवर भाष्य केलं.
मुख्य सचिवांचं परिपत्रक ६ जून रोजी निघालं, त्यात एनसीआरटीची पुस्तकं अनिवार्य केली. काही वर्षाने बालभारती गायब होईल. आम्ही शासनाच्या परिपत्रकाची होळी करणार आहोत. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी यावं यासाठी त्यांची भेट घेतली असल्याचं दीपक पवार यांनी म्हंटलं आहे. उद्धव ठाकरेंकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना दीपक पवार म्हणाले की, 29 जून रोजी नागरी संघटना आणि प्रतिनिधींची सभा घेणार आहोत. 16 एप्रिलचा शासन निर्णय अनिवार्य शब्द वापरला, 17 जूनच्या निर्णयात अनिवार्य शब्द बदलून सर्वसाधारण हा शब्द वापरला. त्याचा अर्थ तोच आहे. अधिवेशनात आम्ही आझाद मैदानात आंदोलन करणार आहोत. हुतात्म्यांना अभिवादन करून आंदोलन करण्याची उद्धव ठाकरे यांची सूचना आहे. आम्ही अभिवादन करणार आहोत. विधिमंडळात मविआचे सदस्य सर्व आयुधे वापरून विरोध करतील. भाजपकडून संघाकडून रेशीम बागेतून हिंदी आणि हिंदू हिंदुस्थानचं कथन महाराष्ट्रात पोहोचवण्याचं हत्यार, सांस्कृतिक कारस्थानाचं हत्यार म्हणून हिंदी भाषा वापरली जात असेल तर आम्ही स्पष्ट आहोत. आम्ही या हिंदीला विरोध करणार आहोत. उद्धव ठाकरे हे अघोषित हुकूमशाहीविरोधात बोलत आहेत. आम्हाला हिंदीच्या सक्तीतही दिसत आहे. आम्ही काँग्रेसच्या अध्यक्षांना भेटलो. आम्हाला दादा भुसेंनाही भेटू इच्छितो. त्यांना हा निर्णय कसा चुकीचा आहे हे सांगणार आहोत, असंही दीपक पवार म्हणाले.
