Delhi Earthquake Video : राजधानी हादरली… गाढ झोपेत असताना दिल्लीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के

Delhi Earthquake Video : राजधानी हादरली… गाढ झोपेत असताना दिल्लीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के

| Updated on: Feb 17, 2025 | 12:32 PM

दिल्लीकर पहाटे साखर झोपेत असताना म्हणजेच पहाटे पाच वाजून ३६ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.

राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. नवी दिल्ली आणि एनसीआर परिसरात आज पहाटेच्या वेळेला जोरदार भूकंपाचे धक्के बसले. दिल्लीकर पहाटे साखर झोपेत असताना म्हणजेच पहाटे पाच वाजून ३६ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे दिल्लीकरांमध्ये भितीचं वातावरण पसरलंय. दिल्लीत पहाटे ५.३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. याचे केंद्र दिल्लीच्या जवळच जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर होते. हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये २८.५९ उत्तर अक्षांश, ७७.१६ पूर्व रेखांश, ५ किमी खोलीवर झाला असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, दिल्ली आणि एनसीआरसह शेजारील राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याते समोर येत आहे. मात्र सुदैवाने या भूकंपामुळे कुठेही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. दिल्ली आणि एनसीआरमध्ये जाणवलेल्या या भूकंपाचे केंद्र दुर्गाबाई देशमुख विशेष शिक्षण महाविद्यालयाजवळील धौला कुआं या ठिकाणी होते. पहाटे ५:३६ वाजता झालेला हा भूकंप पाच किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Published on: Feb 17, 2025 12:24 PM