Delhi Election Result : आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?

Delhi Election Result : आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?

| Updated on: Feb 08, 2025 | 12:46 PM

उमेदवाराचे आचार, विचार शुद्ध असणं , जीवन निष्कलंक असणं हे गुण उमेदवारामध्ये असतील तर मतदारांना त्याचा विश्वास वाटतो. तो आमच्यासाठी काही करू शकेल, असा विश्वास त्यांना वाटतो. मी वारंवार सांगत होतो, पण त्यांच्या डोक्यातच शिरत नव्हतं, अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी आपच्या पराभवानंतर टीका केली.

उमेदवाराचे आचार, विचार शुद्ध असणं , जीवन निष्कलंक असणं हे गुण उमेदवारामध्ये असतील तर मतदारांना त्याचा विश्वास वाटतो. तो आमच्यासाठी काही करू शकेल, असा विश्वास त्यांना वाटतो. मी वारंवार सांगत होतो, पण त्यांच्या डोक्यातच शिरत नव्हतं, त्यांच्या डोक्यात पैशाची, सत्तेची हवा गेली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला, असे अण्णा हजारे म्हणाले.अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी आपच्या पराभवानंतर टीका केली. ‘आप’ला मतदान करू नका असं आवाहनही त्यांनी केलं होतं. ‘आप’च्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन अण्णा हजारेंनी केलं होतं.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला 27 वर्षांनी मोठा विजय मिळताना दिसत आहे तर सत्ताधारी आम आदमी पक्षाल मात्र फटका बसला असून मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. भाजप 42 जागांवर तर आप 28 जागांवर आघाडीवर दिसत आहे, मात्र काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाहीये. अरविंद केजरीवाल यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न आता भंगले असून भाजपचा मुख्यमंत्री कोण याकडे राजधानी वासियांचे लक्ष लागले आहे.

 

Published on: Feb 08, 2025 12:29 PM