शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले…
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये सकाळी 11 वाजता ही भेट होणार असून, मतदारसंघातील विविध प्रश्नांवर खासदार मोदींशी चर्चा करणार आहेत. मात्र, या भेटीमुळे राजकीय चर्चांना वेग आलं आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये सकाळी 11 वाजता ही भेट होणार असून, मतदारसंघातील विविध प्रश्नांवर खासदार मोदींशी चर्चा करणार आहेत. मात्र, या भेटीमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे.
डिलीमिटेशनच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे खासदार एनडीएला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, खासदार बजरंग सोनवणे यांनी या चर्चांना स्पष्टपणे फेटाळले आहे. मोदींसोबत मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भेटीपूर्वी माध्यमांशी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, ‘सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मराठवाडा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. पाणी नाही. पाऊस नसल्याने नदीतही पाणी नाही. जवळपास 50 टक्के वेळ पावसाळ्याचा निघून गेला आहे. तरीही अद्याप पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खास निधीची मागणी करणे आणि चर्चा करणे, हा विषय आहे’.
दरम्यान, रोहित पवार यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे खासदार उद्या जाऊन भेटणार आहेत. पंतप्रधान मोदींची भेट घेऊन कामे करून घेतील. खासदार शेतकऱ्यांशी संबंधित कामे करून घेतील. त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न आहेत, अशी माहिती पक्षश्रेष्ठींकडून मिळाली आहे’. रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे खासदार एनडीएच्या विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचेही स्पष्ट केले.
