Delhi Blast Case: दहशतवादी डॉक्टरांच्या मोबाईलमध्ये 200 व्हिडीओ, ‘त्या’ व्हिडीओत असं काय दिसलं? डीलिट केलेला डेटा…

Delhi Blast Case: दहशतवादी डॉक्टरांच्या मोबाईलमध्ये 200 व्हिडीओ, ‘त्या’ व्हिडीओत असं काय दिसलं? डीलिट केलेला डेटा…

| Updated on: Nov 21, 2025 | 12:14 PM

दिल्ली स्फोट प्रकरणी महत्त्वाचा खुलासा झाला आहे. डॉक्टर मुझम्मिल, आदिल, शाहीन आणि इरफान यांच्या फोनमधील डिलीट केलेला डेटा समोर आला असून, मुझम्मिलच्या फोनमध्ये ISIS संबंधित दहशतवादी प्रशिक्षण आणि बॉम्ब बनवण्याशी संबंधित 80 व्हिडिओ आढळले आहेत. याव्यतिरिक्त, बुलढाणा जिल्ह्यातील शाळेतील पोषण आहाराचा गैरव्यवहार आणि नाशिकमधील आगीची घटनाही समोर आली आहे.

दिल्ली स्फोट प्रकरणातील तपासात नुकतीच एक महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय असलेल्या डॉक्टर मुझम्मिल, डॉक्टर आदिल, डॉक्टर शाहीन आणि इरफान यांच्या मोबाईल फोनमधील डिलीट केलेला डेटा आता तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. यापैकी डॉक्टर मुझम्मिलच्या फोनमध्ये तब्बल 200 व्हिडिओ मिळाले आहेत. या व्हिडिओंपैकी सुमारे 80 व्हिडिओ ISIS शी संबंधित दहशतवाद्यांच्या भाषणांचे तसेच दहशतवादी प्रशिक्षण, बॉम्ब बनवण्याचे तंत्र आणि रासायनिक अभिक्रियांशी संबंधित संशोधनावर आधारित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे दिल्ली स्फोटामागील कटाची व्याप्ती आणि त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध अधिक स्पष्ट होत आहेत.

Published on: Nov 21, 2025 12:14 PM