Delhi Lal Quila Blast : ..अन् अवघ्या 4 मिनिटात ‘त्या’ i 20 मध्ये स्फोट, कारचा मालक कोण? कारमध्ये दहशतवादी उमर? परिवाराच्या दाव्यानं खळबळ
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ i20 कारमध्ये झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जखमी झाले आहेत. जैश-ए-मोहम्मदशी संबंधांचा संशय असून, उमर रशीद नावाच्या दहशतवाद्याचा यात सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. उमरच्या कुटुंबीयांनी मात्र कार आपली नसल्याचा दावा केला आहे. तपास वेगाने सुरु आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलजवळ i20 हुंदाई कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून, ३० पेक्षा जास्त व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृतांमध्ये उत्तर प्रदेशातील अशोक कुमार आणि दिल्लीतील अमर कटारिया यांचा समावेश आहे. मृतांची डीएनए चाचणी सुरु असून अनेकांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांनी i20 गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमानला ताब्यात घेतले आहे, तर पुलवामा येथील तारीक हा सध्याचा मालक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्फोटाच्या तीन तास आधी ही कार सुनहरी मशिदीजवळ पार्क होती आणि तिथून बाहेर पडल्यानंतर अवघ्या चार मिनिटांनी स्फोट झाला. फरिदाबाद टेरर मॉड्युलशी संबंधांचा संशय असून, जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचे पुरावे सापडल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. मुझम्मिल नावाच्या संशयिताच्या बँक व्यवहारांची तपासणी सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी युएपीए (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून १३ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून कारमध्ये दहशतवादी उमर असल्याची माहिती समोर आली असली तरी, उमरच्या कुटुंबीयांनी गाडी आपली नसल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर मुंबईसह देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
