Delhi Red Fort Blast : स्फोट घडवण्यापूर्वी ‘तो’ मिशिदीत, तिथून गाठला लाल किल्ला अन्… दहशतवादी उमरबद्दल मोठी माहिती समोर

Delhi Red Fort Blast : स्फोट घडवण्यापूर्वी ‘तो’ मिशिदीत, तिथून गाठला लाल किल्ला अन्… दहशतवादी उमरबद्दल मोठी माहिती समोर

| Updated on: Nov 13, 2025 | 12:43 PM

दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणाच्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. संशयित दहशतवादी डॉ. उमर स्फोट घडवण्यापूर्वी दिल्लीतील एका मशिदीत गेला होता आणि तिथून तो लाल किल्ल्याकडे रवाना झाला होता.

दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणात तपास यंत्रणांना एक एक धक्कादायक माहिती मिळत आहे.  दिल्लीतील स्फोट घडवण्यापूर्वी डॉ. उमर दिल्लीत एका मशिदीत गेला होता आणि तिथूनच तो लाल किल्ला परिसरात पोहोचल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. डॉ. उमरच स्फोट घडवणाऱ्या कारमध्ये होता अशी पुष्टीही आता झाली आहे. त्याच्या फरिदाबाद ते दिल्ली प्रवासातील सुमारे 50 ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आले आहे. या फुटेजमधून उमरचा संपूर्ण प्रवासक्रम समोर आला आहे.

फरिदाबादमधून आल्यानंतर उमर अशोक विहार येथे जेवणासाठी थांबला होता. त्यानंतर त्याने दिल्लीतील एका जुन्या मशिदीला भेट दिली आणि अखेरीस दुपारी 3 वाजून 19 मिनिटांनी त्याने आपली कार लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये लावली होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

Published on: Nov 13, 2025 12:26 PM