Devdoot Sanman : नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांवर अन्याय, राजू शेट्टींची सरकारवर टीका

| Updated on: Aug 15, 2021 | 8:42 PM

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात 5 नद्यांवर 103 पूल असेल आहेत, ज्यावर दीड ते दोन किलोमीटर भराव आहे. त्या भरावामुळे पाणी रेंगाळतं, 10-10 दिवस पाणी राहतं आणि मोठं नुकसान होतं. अशा ठिकाणी कमानीचे पूल बांधले जावेत. राज्य सरकारनं नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांवर कुठेतरी अन्याय केला आहे असं मला वाटतं. दुकानदाराला 50 हजार रुपये आणि शेतकऱ्याला फक्त 13 हजार रुपये मदत हा अन्याय आहे. हा अन्याय तुम्हाला महागात पडण्यापूर्वी निर्णय बदलावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

Follow us on

महापूर आणि अन्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर सरकारनं कायमस्वरुपी उपाययोजना करायला हव्या. वैश्विक तापमान वाढीमुळं कमी काळात जास्त पाऊस पडतोय आणि त्या पावसाचं पाणी धारण करण्याची नद्यांची क्षमता राहिलेली नाही. नद्यांमध्ये गाळ साचल्यामुळे नद्या उथळ झाल्या आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात 5 नद्यांवर 103 पूल असेल आहेत, ज्यावर दीड ते दोन किलोमीटर भराव आहे. त्या भरावामुळे पाणी रेंगाळतं, 10-10 दिवस पाणी राहतं आणि मोठं नुकसान होतं. अशा ठिकाणी कमानीचे पूल बांधले जावेत. राज्य सरकारनं नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांवर कुठेतरी अन्याय केला आहे असं मला वाटतं. दुकानदाराला 50 हजार रुपये आणि शेतकऱ्याला फक्त 13 हजार रुपये मदत हा अन्याय आहे. हा अन्याय तुम्हाला महागात पडण्यापूर्वी निर्णय बदलावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली.