‘सरकारी कार्यालय कुणाच्या बापाचं नाही’, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला ठणकावलं

‘सरकारी कार्यालय कुणाच्या बापाचं नाही’, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला ठणकावलं

| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 1:05 PM

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे. किरीट सोमय्या ज्या कार्यालयात गेलेले ते सरकारी असून कुणाच्या बापाचं नाही, असं फडणवीस म्हणाले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंत्रालयातील नगरविकास विभागात जाऊन काही कागदपत्रांची पाहणी केली होती. मंत्रालयातील किरीट सोमय्यांचा कागदपत्रांची पाहणी करताना आणि अधिकाऱ्यांच्या खूर्चीत बसलेला फोटो व्हायरल झाला होता. राज्य सरकारनं या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेत किरीट सोमय्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. या  नोटीसवरुन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे. किरीट सोमय्या ज्या कार्यालयात गेलेले ते सरकारी असून कुणाच्या बापाचं नाही, असं फडणवीस म्हणाले. अण्णा हजारे यांनी संघर्ष केल्यानंतर प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकारात तस करता येत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.