Devendra Fadnavis | नदीजोड प्रकल्प वेगाने सुरू; उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

| Updated on: Mar 11, 2026 | 4:58 PM

राज्यातील नदीजोड प्रकल्प अत्यंत वेगाने पुढे सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मराठवाड्यासाठी हा प्रकल्प मोठे वरदान ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, उल्हास खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाचा प्री-फिजिबिलिटी रिपोर्ट आता प्राप्त झाला आहे.

राज्यातील नदीजोड प्रकल्प अत्यंत वेगाने पुढे सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मराठवाड्यासाठी हा प्रकल्प मोठे वरदान ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, उल्हास खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाचा प्री-फिजिबिलिटी रिपोर्ट आता प्राप्त झाला आहे. सुरुवातीला या प्रकल्पातून सुमारे ५४ टीएमसी पाणी उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र नव्या प्री-फिजिबिलिटी अहवालानुसार उल्हास खोऱ्यातून तब्बल ७८ टीएमसी पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वळविणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पासाठी अंदाजे ८७ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी विधानसभेत दिली. या प्रकल्पामुळे मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडविण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Published on: Mar 11, 2026 04:58 PM
Follow Us