Devendra Fadnavis यांचा Thackeray सरकारवर हल्लाबोल
भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारने न्यायालयात दाखल केलेला मागासवर्ग आयोगाचा अहवाल दोषपूर्ण असल्यामुळे कोर्टात बोलताना त्यांचं त त प प झालं, अशी खोचक टीका केली. राज्य सराकरच्या अहवालातच त्रुटी होत्या तर त्यांचे वकील तरी कोर्टात काय मांडणार, असा सवाल फडणवीस यांनी केला.
मुंबईः महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) सुनावणी दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्य सराकरच्या वतीने सादर केलेला मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारला. या अहवालात राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी नसल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. त्यामुळे पुढील निर्देश देईपर्यंत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्यात, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारने न्यायालयात दाखल केलेला मागासवर्ग आयोगाचा अहवाल दोषपूर्ण असल्यामुळे कोर्टात बोलताना त्यांचं त त प प झालं, अशी खोचक टीका केली. राज्य सराकरच्या अहवालातच त्रुटी होत्या तर त्यांचे वकील तरी कोर्टात काय मांडणार, असा सवाल फडणवीस यांनी केला.
