पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
पुण्यात तीन उन्नत महामार्गांच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्य आणि केंद्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे पुणे आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे, त्यांनी या कार्यक्रमात एक सुचक विधान केले आहे. त्यांनी आधीच विकास कामाचा आराखडा कालावधी आणि इतर सर्व गोष्टींची माहिती दिली. यानंतर त्यांनी सांगितले की, ‘आपल्याला महामार्ग चार वर्षांमध्ये पूर्ण करून मिळणार आहेत. मात्र आम्ही सर्व अडथळे दूर सारून देत आहोत, तुम्ही सवा तीन ते साडे तीन वर्षात महामार्गाचे काम पूर्ण करून द्यावे. आमचा कार्यकाळ हा 2029 पर्यंतचाच आहे, ही गोष्ट वेगळीच की पुढच्या वेळीही आम्हीच येणार; मात्र आमचे राजकीय आयुष्य एका टर्मचे असते, त्यामुळे विकास कामे एका टर्ममध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.’ आगामी निवडणुकांबाबतच्या त्यांच्या या विधानामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.