VIDEO : Devendra Fadnavis | नायगावमधील पोलीस वसाहतीचा प्रश्न सोडवणार – देवेंद्र फडणवीस
दादरच्या नायगाव पोलीस वसाहत धोकादायक असल्याने पोलिसांच्या कुटुंबीयांना घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नायगावमध्ये जाऊन पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
दादरच्या नायगाव पोलीस वसाहत धोकादायक असल्याने पोलिसांच्या कुटुंबीयांना घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नायगावमध्ये जाऊन पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. पोलिसांची ही वसाहत धोकादायक वाटत नाही. सरकारने त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं. या वसाहतींची दुरुस्ती करावी आणि निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव पोलीस वसाहतीतील पोलिसांच्या घरांची पाहणीही केली. त्यानंतर रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
