फडणवीसांनी तपास यंत्रणेचे ओएसडी बनावं अन् सोमय्यांना प्रवक्ता नेमावं
मी काही कुणालाही घाबरणार नाही. भाजप ही महाराष्ट्रातील चोरों का बाजार आहे. तर किरीट सोमय्या या बाजारातील बाराती आहेत, असा घणाघाती हल्ला मलिक यांनी चढवला.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तपास यंत्रणांना माझ्याविरोधात सूचना देत आहेत. त्यामुळे त्यांनी आता स्वत: तपास यंत्रणांचा ओएसडी बनावं आणि किरीट सोमय्या यांना या यंत्रणांचा प्रवक्ता बनवावं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी लगावला आहे. नवाब मलिक बीडमध्ये आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवरच हल्ला चढवला. फडणवीस तपास यंत्रणांना माझ्याविरोधात सूचना देत आहेत. मी काही कुणालाही घाबरणार नाही. भाजप ही महाराष्ट्रातील चोरों का बाजार आहे. तर किरीट सोमय्या या बाजारातील बाराती आहेत, असा घणाघाती हल्ला मलिक यांनी चढवला.
Published on: Dec 20, 2021 01:51 PM
