Devendra Fadnavis : महादेव मुंडे हत्या प्रकरण विधानसभेत; मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती
विधानसभेत बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासाची सविस्तर माहिती दिली.
विधानसभेत बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, या प्रकरणाचा तपास मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून 196 जणांची चौकशी करण्यात आली असून, 83 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत. तसेच, 286 जणांचे मोबाइल डेटाद्वारे तपासले गेले आहे. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.
फडणवीस यांनी सांगितले की, हा हल्ला खुल्या मैदानात झाल्याने साक्षीदार मिळणे कठीण झाले आहे. तथापि, दीड महिन्यांनंतर एक महिला साक्षीदार पुढे आली आहे. डम डेटाचे विश्लेषणही सुरू आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नीचा आक्रोश मी समजू शकतो. या प्रकरणी कोणालाही माफ केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री यांनी ठामपणे सांगितले.
जलील शेख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, जलील शेख मनसेचे कार्यकर्ते होते. फिर्यादीत नजीब मुल्ला यांनी कारस्थान रचल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणी 9 आरोपी निश्चित झाले असून, त्यापैकी 7 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 2 जण फरार आहेत. या प्रकरणातील पुराव्यांची पुन्हा पडताळणी केली जाईल आणि नव्याने चौकशी होईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले.
