वादग्रस्त विधान खपवून घेणार नाही; मुख्यमंत्र्यांनी टोचले मंत्र्यांचे कान
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सर्व मंत्र्यांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तंबी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी मंत्र्यांकडून होणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे सरकारची चांगलीच नाचक्की होताना दिसत आहे. याचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीला बसू शकतो. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सर्व मंत्र्यांना आज याबाबत तंबी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांचे कान टोचले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचे कान टोचले आहे. वादग्रस्त वक्तव्य, कृती खपवून घेणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महायुतीच्या काही मंत्र्यांकडून होणाऱ्या वादग्रस्त विधानाने महायुतीवर टीका केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता सर्व मंत्र्यांना तंबी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत की, वादग्रस्त विधान आणि कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. असे प्रकार होत राहिले तर सरकारची बदनामी होते. ही अखेरची संधी आहे. जी कारवाई करायची ती करूच असंही फडणवीस यांनी म्हंटलं.
