Plane Crash : एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची…
भारताच्या नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) सर्व बोईंग ड्रीमलायनर विमानांच्या ताफ्यातील सुरक्षा तपासणी कडक केली आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमान AI171 च्या भीषण अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीएकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता बोईंगच्या सर्व विमानाची तपासणी करण्यात येणार आहे. बोईंग 787 आणि 8/9 या विमानाची तपासणी होणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाच्या बोईंग 787 आणि 8/9 ड्रीमलायनर विमानाची सुरक्षा तपासणी वाढवण्याचे आदेश दिले आहेत. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. डीजीसीएकडून घेण्यात आलेल्या मोठ्या निर्णयामध्ये एअर इंडियाचे फ्लाइट AI171, जे बोईंग 787-8 ड्रीमलायनर होते, ते क्रॅश झाले. या अपघातात 240 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. DGCA ने एअर इंडियाला 15 जून 2025 च्या मध्यरात्रीपासून भारतातून उड्डाण करण्यापूर्वी एकदा बोईंग विमानांची विशेष तपासणी प्रक्रिया लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
Published on: Jun 13, 2025 06:32 PM
