Dharashiv : बळीराजाचा टाहो सरकार कधी ऐकणार? शेतकरी आंदोलकांचा राडा, कुणी झाडावर तर कुणी गेटवर चढलं अन्….

Dharashiv : बळीराजाचा टाहो सरकार कधी ऐकणार? शेतकरी आंदोलकांचा राडा, कुणी झाडावर तर कुणी गेटवर चढलं अन्….

| Updated on: Oct 06, 2025 | 11:37 AM

धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासमोर तीव्र संताप व्यक्त केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ५० हजार रुपये हेक्टरी मदत, ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि निवडणूक आश्वासनानुसार कर्जमाफीची मागणी केली. चार दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आक्रोश व्यक्त केला.

धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. चार दिवसांपासून उपोषण करत असलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकारी किंवा नेत्यांकडून दखल न घेतल्याने संताप व्यक्त केला. भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील एका कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर आंदोलकांचा संताप अनावर झाला. महिला आंदोलकांनी त्यांना घेराव घालत मदतीबाबत जाब विचारला. शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे वचन पूर्ण करावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या. प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे या घटनेतून समोर आले.

Published on: Oct 06, 2025 11:37 AM