Dharmendra Passes Away : शेवटचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच धर्मेंद्र यांची Exit, ‘हा’ ठरला अखेरचा सिनेमा, 25 डिसेंबरला…
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, बॉलीवूडमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. १९६० पासून सहा दशके त्यांनी चित्रपटसृतीवर राज्य केले. ७४ हिट चित्रपटांसह २४० हून अधिक सिनेमांमध्ये काम करणाऱ्या धर्मेंद्र यांना पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेकांनी आदरांजली वाहिली.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. १९६० मध्ये अभिनयात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी सहा दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या नावावर ७४ हिट चित्रपटांचा विक्रम आहे, तर २४० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. यामध्ये शोले सारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचाही समावेश आहे. ‘इक्कीस’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. धर्मेंद्र यांचा इक्कीस हा चित्रपट येत्या २५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र त्यापूर्वीच धर्मेंद्र यांची Exit चाहत्याच्या मनाला चटका लावून जाणारी ठरली.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी धर्मेंद्र यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्याचे म्हटले आहे. धर्मेंद्र यांचे नम्र व्यक्तिमत्त्व, माणुसकी आणि संवेदनशीलता या गुणांमुळे ते प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहतील.
