Dhurandhar: भारताला जवळचा मित्र मानणारा ‘हा’ देश ‘धुरंधर’वर का नाराज?

Dhurandhar: भारताला जवळचा मित्र मानणारा ‘हा’ देश ‘धुरंधर’वर का नाराज?

| Updated on: Jan 09, 2026 | 2:42 PM

भारताला आपला जवळचा मित्र मानणारा हा देश आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट पाहून नाराज झाला आहे. या चित्रपटात त्यांचं नकारात्मक चित्रण केल्याचा आरोप बलुचिस्तानमधल्या नेत्यांनी केला आहे. नेमकं प्रकरण काय, ते व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या..

पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा असल्याची गोष्ट जगजाहीर आहे. त्याचभोवती धुरंधर चित्रपटाचं कथानक फिरतं. पण या सिनेमावर बलुचिस्तानमधील नेते नाराज झाले आहेत. यामध्ये बलूच लोकांना दहशतवाद्यांची मदत करताना दाखवण्यात आलं आहे. पण वास्तविक पाहता बलूच लोकंच पाकिस्तानच्या दहशतवादानं त्रस्त आहेत. पाकिस्तानच्या दडपशाहीविरोधात गेल्या 80 वर्षांहून अधिक काळापासून त्यांचा संघर्ष सुरू आहे. ही लोकं भारताला जवळचा मित्र मानतात. त्यांनी अनेकदा त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीला भारताने जाहीर पाठिंबा देण्याची मागणी केलेली आहे. परंतु धुरंधर या चित्रपटात त्यांची नकारात्मक प्रतिमा दाखवल्याने बलूच नाराज झाले आहेत.

Published on: Jan 09, 2026 02:42 PM