बंटी पाटलांना महाडिकांचा दुसरा दनका!; न्यायालयाने दिला गोकुळबाबत ‘हा’ आदेश

| Updated on: May 05, 2023 | 8:30 AM

सत्ताधाऱ्यांनी संघाच्यावतीने उच्च न्यायालयात धाव घेत शासनाच्या आदेशाने सुरू असलेले चाचणी लेखापरीक्षण थांबवावे, अशी याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

Follow us on

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी संचालिका शौमिका महाडिक यांनी केली होती. त्याप्रमाणे दहा दिवसांत गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण पूर्ण करावे, अशा सूचना लेखापरीक्षा मंडळाच्या विशेष कार्यकारी अधिकारी यांनी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक बी. एस. मसुगडे यांना दिल्या होत्या. त्याविरोधात सत्ताधाऱ्यांनी संघाच्यावतीने उच्च न्यायालयात धाव घेत शासनाच्या आदेशाने सुरू असलेले चाचणी लेखापरीक्षण थांबवावे, अशी याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना चांगलाच धक्का न्यायालयाने दिला आहे. तर येत्या एक महिन्यात लेखा परीक्षण पूर्ण करून 8 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे सत्तारूढ गटाला धक्का बसला आहे. तर राजाराम हातातून निसटल्याने टीकेचे धनी झालेल्या माजी पालक मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना हा महाडिकांनी दिलेला दुसरा शह मानला जात आहे.