दिवाळी आली, मातीचे आकाश कंदील घेऊन… सजले घर आणि अंगण…

दिवाळी आली, मातीचे आकाश कंदील घेऊन… सजले घर आणि अंगण…

| Updated on: Nov 07, 2023 | 10:33 PM

दिवाळीची खरेदी करण्यासाठी विविध बाजारात एकच गर्दी उसळली आहे. यंदाच्या वर्षी बाजारात आकर्षक असे मातीचे आकाश कंदील आले आहे. मातीचे कंदील आणि झुंबर यांना ग्राहकांकडून यंदा विशेष मागणी आहे.

नाशिक | 7 नोव्हेंबर 2023 : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीची खरेदी करण्यासाठी विविध बाजारात एकच गर्दी उसळली आहे. दीपावलीनिमित बाजारात पणती, दिवे आणि आकाश कंदील अशा वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. यंदाच्या वर्षी बाजारात आकर्षक असे मातीचे आकाश कंदील आले आहे. टेरोकोटा या मातीपासून बनवलेले मडक्याच्या आकारातील हे कंदील सर्व ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचप्रमाणे मातीचे झुंबरदेखील ग्राहकांना आकर्षित करून घेत आहेत. मातीचे कंदील आणि झुंबर यांना ग्राहकांकडून यंदा विशेष मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. साधारणतः शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत असे या आकाश कंदीलचे दर आहे. हे आकाश कंदील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Published on: Nov 07, 2023 10:33 PM