Special Report | सीमेवरील जवानांची दिवाळी, जवानांकडून मिठाई भेटवस्तूंचं वाटप
दिवाळी, होळी, ईद यांसारख्या प्रमुख सणांच्या दिवशी भारतीय आणि पाकिस्तानी लष्करामध्ये सीमेवर एकमेकांना मिठाईची दिण्याची परंपरा आहे.
नवी दिल्लीः भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी लष्करामध्ये दिवाळीनिमित्त सीमेवर गुरुवारी मिठाईची देवाणघेवाण झाली. नियंत्रण रेषेवरील (एलओसी) क्रॉसिंग पुलावर भारतीय आणि पाक सैन्यांनी एकमेकांना मिठाईची दिली. दिवाळी, होळी, ईद यांसारख्या प्रमुख सणांच्या दिवशी भारतीय आणि पाकिस्तानी लष्करामध्ये सीमेवर एकमेकांना मिठाईची दिण्याची परंपरा आहे. गुजरातमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि राजस्थानच्या बारमेर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाक रेंजर्समध्येही मिठाईची देवाणघेवाण झाली.
