Dombivali Election: आदेश आला की माघार.. आता माझाच बळी? माघारीसाठी थेट उमेदवाराला फोन, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाचा ऑडिओ तुफान व्हायरल

Dombivali Election: आदेश आला की माघार.. आता माझाच बळी? माघारीसाठी थेट उमेदवाराला फोन, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाचा ऑडिओ तुफान व्हायरल

| Updated on: Jan 05, 2026 | 2:42 PM

डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली म्हात्रे यांना पक्षाचा आदेश देत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत जिल्हाप्रमुखांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, यात म्हात्रे यांनी माझाच बळी असे म्हटले आहे. उमेदवारी वाटपात तिकिटे विकल्याचा आणि एका घरात दोन तिकिटे दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे, ज्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे.

डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली म्हात्रे यांना पक्षाचा आदेश देत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ठाकरे गटाच्या एका जिल्हाप्रमुखाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. टीव्ही नाईन मराठी या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. या ऑडिओ क्लिपमध्ये जिल्हाप्रमुख वैशाली म्हात्रे यांना पक्षाचा आदेश असल्याने उमेदवारी मागे घेण्याची विनंती करताना ऐकू येत आहेत. तर, वैशाली म्हात्रे यांनी, “माझाच बळी” असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये निवडणूक निकालापूर्वीच वीस उमेदवार बिनविरोध झाल्याची माहिती आहे. पक्षादेशामुळे माघार घेण्याच्या सूचना मिळत असल्याने ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे.

Published on: Jan 05, 2026 02:42 PM