Donald Trump : मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे अ‍ॅपलच्या सीइओंना आदेश

Donald Trump : मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे अ‍ॅपलच्या सीइओंना आदेश

| Updated on: May 16, 2025 | 12:33 PM

Trump Advises Apple CEO : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात अ‍ॅपलचे कारखाने उभारू नका, असा सल्ला अ‍ॅपलचे सीइओ टीम कुक यांना दिला आहे.

भारतात अ‍ॅपलचे कारखाने उभारू नका, असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपलचे सीइओ टीम कुक यांना दिला आहे. ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे महत्वाचं विधान केलेलं आहे. या देशांतर्गत उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्याचा ट्रम्प यांचा हा सल्ला आहे. इतकंच नाही तर, मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, असंही ट्रम्प यांनी म्हंटलं आहे.

ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं विधान आता चर्चेत आलेलं आहे. भारतात अ‍ॅपलचे कारखाने उभारू नका असा थेट सल्लाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपलचे सीइओ टीम कुकला दिला आहे. त्यामुळे आता एकीकडे भारत पाकिस्तान युद्धात मध्यस्थी केल्याचं सांगणाऱ्या ट्रम्प यांची ही भूमिका विरोधाभास निर्माण करत आहे.

Published on: May 15, 2025 03:29 PM