Maharashtra Congress | राजीव सातव यांच्या पत्नी महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी

Maharashtra Congress | राजीव सातव यांच्या पत्नी महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी

| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 3:13 PM

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर त्या राजीव सातव यांच्या आठवणीने गहिवरल्या

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर त्या राजीव सातव यांच्या आठवणीने गहिवरल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडीही जाहीर केल्या आहेत. यामध्ये उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे.

प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्ष म्हणून  निवड झाल्यानंतर टीव्ही 9 मराठीने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजीव सातव यांची क्षणाक्षणाला आठवण येत असल्याचं सांगितलं. तसंच मिळालेली संधी मोठी आहे. कामाला मोठी स्पेस आहे. या कामात राजीवजींच्या कार्यकर्त्यांचं मोठं पाठबळ असेल. मी चांगलं काम करुन दाखवेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.