Phaltan Doctor Death  : डॉक्टर महिलेची हत्या की आत्महत्या? संशयास्पद मृत्यूबद्दल कुटुंबियांनी नेमकं काय म्हटलं?

Phaltan Doctor Death : डॉक्टर महिलेची हत्या की आत्महत्या? संशयास्पद मृत्यूबद्दल कुटुंबियांनी नेमकं काय म्हटलं?

| Updated on: Oct 27, 2025 | 1:22 PM

डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. "आत्महत्या की हत्या" या दिशेने तपास व्हावा, अशी त्यांची मागणी आहे. पोलिसांनी पोस्ट मॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी छळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, दोषींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे.

सातारा जिल्ह्यात डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने लक्ष वेधले आहे. कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांचा जीव घेतला गेला की त्यांनी आत्महत्या केली, या अँगलने तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, पोलिसांकडून पोस्ट मॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी संपदा यांना वारंवार टॉर्चर केले जात होते. त्यांची आधीची तक्रार विचारात घेऊन सर्व आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करत दोन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. आठ दिवसांत एसआयटी चौकशी न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Published on: Oct 25, 2025 11:06 PM