Earthquake | अन् सकाळी सकाळीच लोक घरातून धावतच सुटले, राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत

Earthquake | अन् सकाळी सकाळीच लोक घरातून धावतच सुटले, राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत

| Updated on: Apr 11, 2026 | 1:24 PM

नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 8 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास जमिनीला हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये हा धक्का प्रकर्षाने जाणवला.

नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 8 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास जमिनीला हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये हा धक्का प्रकर्षाने जाणवला. 2017 पासून या भागात सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के बसत असल्याची नोंद आहे. मात्र आजचा हादरा आतापर्यंतचा सर्वात तीव्र असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. भूकंप मापक केंद्रांमध्ये या हालचालींची नोंद झाली असून, तरीही प्रशासनाकडून ग्रामस्थांना कोणतीही ठोस मार्गदर्शक सूचना किंवा आपत्कालीन उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि अस्वस्थता वाढली आहे. परिसरात कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

Published on: Apr 11, 2026 01:24 PM
Follow Us