Ebola | 3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते आहेत ते तीन देश?
इबोला विषाणूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये सध्या इबोलाचा धोका वाढत असल्याने भारतीय नागरिकांनी या देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळावा, असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात अद्याप इबोला संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने सतर्कता वाढवली असून विमानतळांसह विविध ठिकाणी आरोग्य यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, संशयित लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी आणि सरकारी सूचनांचे पालन करावे, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पुढील काळात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.